यूनाइट फॉर ह्यूमैनिटी हिंदी समाचार पत्र

RNI - UPHIN/2013/55191 (साप्ताहिक)
RNI - UPHIN/2014/57987 (दैनिक)
RNI - UPBIL/2015/65021 (मासिक)

मॉडेल आणि फोटोग्राफर अधिराज यांचा लॉकडाऊन दरम्यानचा अनुभव


🗒 सोमवार, अप्रैल 20 2020
🖋 विक्रम सिंह यादव, प्रधान संपादक
मॉडेल आणि फोटोग्राफर अधिराज यांचा लॉकडाऊन दरम्यानचा अनुभव
“खाली दिमाग शैतान का घर” – एक प्रसिद्ध हिन्दी म्हण आज मला प्रखरतेन आठवते अश्याच खुपसार्‍या म्हणी मी शालेय जीवनात ऐकल्या होत्या. माझ्या वडिलांची ती सवय होती, ते मला शालेय जीवनात बोधकथा व म्हणी सांगायचे. त्यावेळेस मला या म्हणींचा अर्थ क्वचितच समजत होता  ... माझ्या वडिलांचा कदाचित तो छंद असेल असे समजून मी त्या म्हणी  दुर्लक्षित करत असे! पण आता मला जाणवले… ते ज्या गोष्टी मला सांगायचे, त्या सर्व गोष्टी माझ्या मनाला स्पर्श करुन का  जायच्या .… त्यांचा हेतू किती सखोल होता.सध्या संपूर्ण लॉकडाउन सुरू असताना, बर्‍याच गोष्टी नेहमीसारख्या नाहीत. अश्या विपरीत परिस्थितीत आपले मन रिकामे न ठेवने फार महत्वाचे आहे… असे ही म्हटले जाऊ शकते की आजूबाजूला करण्यासारख काहीच नाही… सर्व साधारण लोकांप्रमाणे सोशल मीडिया, रोजच्या बातम्या आणि व्हिडिओ पाहण्याऐवजी मी माझा काही वेळ सकारात्मक लिखाण वाचण करण्यात घालवित आहे. तथापि, जगात काय घडत आहे याची जाणीव असणे आवश्यक आहे, परंतु आपण खोट्या बातम्या, नकारात्मक विचार आणि टीका ऐकण्यात जितका वेळ वाया घालवतो याची जाणीव सुद्धा आपल्याला असायला पाहिजे.बर्‍याच वेळेस आपण नकारात्मकतेच्या सावटाखाली असतो आणि आपल्यातील मूलभूत करुणामई स्वभाव विसरतो, जो आपला एक अत्यावश्यक स्वभाव गुण आहे… आणि अश्या विपरीत परिस्थित हे गुण प्रामुख्याने जोपासला पाहिजेत. मी सत्य, करुणा, सहनशीलतेच अनुसरण करतो ... ही फालुन दाफाची मूलभूत तत्त्वे आहेत. फालुन दाफा मनाची आणि शरीराची एक प्राचीन साधना पद्धत आहे. सध्याच्या परिस्थिति मध्ये वेळ उपळब्श आहे त्याचा उपयोग मला नियमितपणे ध्यान करण्यासाथी व पाच व्यायाम नियमितपणे करण्यासाथी होत आहे ... नियमित व्ययाम आणि ध्यान माझ्या मनाला शांत आणि संयमित ठेवण्यास मदत करते . तसेच हा  सराव रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते, म्हणून मी घरी पूर्ण वेळ असूनही मला खूप उत्साह, चैतन्य आणि आंतरिक शांति जाणवते. याव्यतिरिक्त, फालुन दाफाचे संस्थापक श्री. ली होंगझी यांच्या शिकवणीचे पुस्तक (झुवान फालुन) चे नियमित वाचन माझ्यासाठी एक उत्कृष्ट  मार्गदर्शक सिद्ध होत आहे. लॉकडाउन नंतर मी माझ्या आईसोबत राहत आहे, त्यामुळे मी तीला सुद्धा फालून दाफा साधना शिकवू शकलो. तिच्यासाठी देखील ही साधना फायदेशीर ठरते आहे.
एक सर्जनशील व्यक्ती आणि एक स्वत: शिकलेला छायाचित्रकार म्हणून, मला सतत माझ्या कौशल्याचा विकास करण्याची गरज असते. म्हणूनच, मी माझे ज्ञान ऑनलाइन धडे घेवून वाढविण्यासाठी नियमित निर्धारित वेळेत प्रयत्न करत असतो. ज्ञान संपादित करतो आणि इतरांना प्रशिक्षण देवून स्वतःच कौशल्य सुधारण्याचा प्रयत्न करीत आहे. काही दिवसापूर्वी मला घरी माझी जुनी बासरी सापडली… त्या बासरीवर मी पूर्वी  शिकलेल्या काही धुन वाजवण्याचा प्रयत्न करीत आहे. संगीताचा आपल्या आंतर मनाशी खोल संबंध आहे. शांत आणि मधुर संगीत ऐकणे हे माझ्या दैनंदिन जीवनाचा नेहमीच एक भाग आहे.
आपल्या विवेकाशी पुन्हा जुडण्याची ही नक्कीच वेळ आहे. मी काही वर्षांपूर्वी कविता लिहिणे सोडले होते आणि आता चार भिंतींच्या हद्दीत राहत असलो तरीही सकारात्मक राहणे, ही माझी सर्जनशील बाजू पुनःजीवित करण्यात मदत करीत आहे. . सध्या मी काही कविता लिहिण्यास यशस्वी झालो आहे आणि कोणाला माहित, एकदिवस कदाचित माझ्या कडे एवढ्या कविता जमा होतील की मी त्या प्रकाशित करू शकेल!
शेवटी, मला या संपूर्ण परिस्थितीतून समजले आहे की आपल्या आजूबाजूस जे काही घडते त्याच्यामागे काही मोठी कारणे आसतात, आपण आपल्या विचारांवर आणि कृतींबद्दल चिंतन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा क्षण आम्हाला देण्यात आला आहे आणि या रिकाम्या वेळेत आपल्या निष्क्रिय मनात वाईट विचार उत्पन्न न होवू देणे हा एक पर्याय आपल्याकडे आहे
हम गर्व से चलें करके सर ऊँचा, 
मीलों दूर मृगतृष्णा से आगे, 
उन सूखी झाड़ियों के कांटो के पार, 
तपते नीरस रेगिस्तान की झुलसाने वाली गर्मी में ... 
जबकि, पड़ाव अधिक दूर नहीं है, 
जहाँ ताड़ वृक्ष और सुखमयी जल है भरपूर ... 
आओ लौटें सब उस अनंत नखलिस्तान को।
- अधिराज चक्रवर्ती
[ मिस्टर इंडिया फायनलिस्ट अधिराज चक्रवर्ती हे मुंबईचे एक प्रख्यात मॉडेल आणि उदयोन्मुख फॅशन फोटोग्राफर आहेत. ते फालुन दाफा (या मनाची आणि शरीराची एक प्राचीन) साधनेचा साधक आहेत. याबाबत अधिक माहिती साठी खालील सांकेत स्थळाला भेट द्या www.falundafindia.org ]